Jyotirao Phule : मुलींसाठी पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली, महात्मा फुलेंनी अनुकरण केले - उदयनराजे भोसले


Udayanraje Bhosale on Jyotirao Phule : "सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली" असं वक्तव्य आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेल्या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं. उदयनराजे भोसले यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. उदयनराजे यांच्या यांच्या या वक्तव्याचा समाचार ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी घेतला आहे.

आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अनेक नेत्यांनी पुण्यातील फुले वाड्यात हजेरी लावली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले यांच्यासह अनेकांनी फुले वाड्यात हजेरी लावली. महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त फुले वाड्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे महत्मा फुले यांच्या चित्रपटावरून प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात आंदोलन पुकारलेय.

Follow us -

उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले ?

एका दृष्टीकोनातून आपण पाहीलं तर थोरले प्रतापसिंह महाराज यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्वत:च्या राजवाड्यात सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहीलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं.

मंगेश ससाणे काय म्हणाले ?

उदयनराजे यांचं वक्तव्य तीन- चार वेळेस ऐकलं. महात्मा फुलेंचं महत्व कळल्याने उदयनराजे हे फुले वाड्यावर आलेत असं वाटलं. इथं येऊन जयंतीच्या दिवशी. फुलेंचं महत्व कमी करायचं. त्यांच्या पुर्वजांचं महत्व वाढवलंय. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना अवघा महाराष्ट्र जाणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला, असे मंगेश ससाणे म्हणाले.

महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1948 साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयनराजे यांचा आक्षेप आहे. त्यांनी नवा शोध लावला आहे. उदयन राजे यांनी जे वक्तव्य केले. प्रतापसिंह यांनी जी पहिली शाळा सुरू केली. शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? त्यांचं काय झालं? परत शाळा का सुरू राहिली नाही? त्यानंतरच्या वंशजांनी आणि उदयनराजे यांनी सुद्धा शैक्षणिक वारसा पुढे का घेऊन गेला नाहीत? असा सवाल ससाणे यांनी उपस्थित केला.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply