Mumbai : जुहू चौपाटीवर पोहायला गेलेले पाच मुले बुडाली, एकाला स्थानिकांनी वाचवलं

Juhu Chowpatty Six People Drowned: मुंबईचा प्रसिद्ध अशा जुहू चौपाटीवर सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पाच जण समुद्रात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहाजण बुडाले.

यातील एकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाचवण्यात यश आले. मात्र चार जण गायब असून नौदल व अग्निशमन दलामार्फत शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पाची मुलं 12 ते 15 वयोगटातील असल्याची माहीती मिळाली आहे.

दोन दिवसापासून अरबी समुद्रात भोंगावणाऱ्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबई सह कोकण किनारपट्टीवर लाटांचे तांडव पाहायला मिळत आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर जाणे टाळावे, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. 

तरीही सोमवारी सायंकाळी पाच साडेपाच वाजण्याच्या सुमारास काही तरुण जुहू कोळीवाडा येथे समुद्रात उतरले. समुद्रात तुफान असल्यामुळे उतरू नये, असा सल्ला स्थानिक नागरिकांनी दिला होता. पण स्थानिकांची नजर चुकवून हे तरुण समुद्रात गेल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही जण बुडाले यातील एकाला स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलासह नौदलाला पाचारण करण्यात आले. सध्या या चौघांचा शोध सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी रुग्णवाहिकेसह पोलिस, अग्निशमन दल, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply