Joshimath Sinking : १२ दिवसांत ५.४ सेंटीमीटर खचला जोशीमठ; इस्रोने दिला धोक्याचा इशारा ! संपूर्ण पवित्र जोशीमठ शहरंच उध्वस्त होणार?

जोशीमठ सध्या देशभरासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून जोशीमठच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच जोशीमठ पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे.इस्रोच्या (ISRO) उपग्रहाकडून जोशीमठचा फोटोही जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये पिवळ्या रंगाने जो भाग दाखवला आहे, तो जोशीमठ शहराचा आहे. यामध्ये आर्मी हेलिपॅड आणि नरसिंह मंदीर दाखवण्यात आलं आहे. इस्रोच्या हैद्राबाद इथल्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरकडून हा अहवाल जारी करण्यात आला आहे.

सध्या सरकारकडून जोशीमठ इथल्या लोकांना धोकादायक क्षेत्रातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून जोशीमठ इथं भूस्खलन आणि जमिनीला भेगा पडत असल्याची माहिती मिळत आहे. ७०० हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. तर रस्ते, हॉटेल, दवाखाने यांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत.

इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून ७ ते १० जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये जोशीमठचे फोटो घेतले आहेत. त्यावर तांत्रिक प्रक्रिया केल्यानंतर लक्षात आलं आहे की कोणता भाग खचला आणि कोणता भाग खचू शकतो. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमीन खचण्याचा वेग कमी होता. या कालावधीत जोशीमठ ८ ते ९ सेंटिमीटरपर्यंत खचला होता. पण २७ डिसेंबर पासून ८ जानेवारी २०२३ पर्यंतच्या १२ दिवसांमध्ये ही तीव्रता ५.४ सेटिंमीटर झाली आहे, त्यामुळे जमीन खचण्याचा वेग वाढला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply