Joshimath : जोशीमठात आणखी दोन हॉटेल्स धोकादायकरित्या झुकले; परिसरातील नागरिकांच्या मनात धडकी कायम

जोशीमठाची जमीन दिवसेंदिवस खचत चालली आहे. जोशीमठाच्या भागात राहण्याऱ्यांचा धोका अद्याप टळला नाही. भूस्खलनग्रस्त जोशीमठमध्ये आणखी दोन हॉटेल्सना तडे गेले आहेत. धोकादायकरीत्या हॉटेल्स झुकल्याने पुन्हा भीतीचे वातावरण परिसरात पसरले आहे. 

भूस्खलनग्रस्त जोशीमठमध्ये आणखी दोन हॉटेल्स धोकादायकरित्या झुकले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावारण पसरले आहते. औली रोपवेजवळ आणि जोशीमठच्या इतर भागांमध्ये इमारतींना आणखी मोठे तडे गेले आहेत.

तडे गेलेल्या घरांची संख्या वाढून ८२६ झाली असून त्यापैकी १६५ घरे ‘असुरक्षित भागात आहेत. आतापर्यंत २३३ कुटुंबांना तात्पुरत्या मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आलं आहे.सर्वोच्च न्यायालय आज जोशीमठाच्या संदर्भात स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणार आहे. जोशीमठाची जमीन गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खचत आहे. इथल्या अनेक घरांना तडे गेले आहेत. त्यामुळं अनेक लोकांना राहतं घर सोडून जावं लागत आहे.

त्यामुळं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी जोशीमठ संकट हे राष्ट्रीय आपत्ती  म्हणून घोषित करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर सरन्यायाधीश डीवाई चंद्रचूड, न्यायमुर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमुर्ती जेबी पारडीवाला यांचं खंडपीठ फैसला देणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply