JNPA Port To Gateway of India Travel : एकच नंबर! जेएनपीए ते गेट वे फक्त २५ मिनिटांत, लाकडी बोटींची जागा स्पीडबोट घेणार

 

JNPA Port To Gateway of India Travel : उरणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. आता उरणकरांना अवघ्या २५ मिनिटांमध्ये गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे. हा प्रवास जलद करण्यासाठी जेएनपीए प्रशासनाने प्रदूषणविरहित स्पीड बोटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. महत्वाचे म्हणजे उरणकरांचा हा प्रवास गारेगार होणार आहे. या स्पीड बोटीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या निधीला जेएनपीए प्रशासनाने मंजुरी दिली आहे.

जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ इंडियादरम्यानचा जलप्रवास फेब्रुवारी महिन्यापासून सुसाट होणार आहे. या बंदरापासून गेट वे ऑफ इंडियाला जाण्यासाठी १ तासाचा कालावधी लागतो. पण आता फेब्रुवारीपासून हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांमध्ये होणार आहे. जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या लाकडी बोटींची जागा स्पीड बोट घेणार आहे. त्यामुळे उरणकरांना वातानुकूलित प्रवास करत अवघ्या २५ मिनिटांत गेट वे ऑफ इंडिया गाठता येणार आहे.

Sangli Crime News : सांगलीत विचित्र अपघात, भरधाव वाहनानं फरपटत नेलं; मृतदेहाच्या चिंधड्या

जेएनपीए ते गेट वे प्रवासासाठी सध्या लाकडी बोटींचा वापर केला जात आहे. पण आता स्पीड बोटचा वापर केला जाणार आहे. प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या या स्पीड बोट आता उरकरणाच्या प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय असणार आहे. प्रदूषणविरहित, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत येण्यासाठी स्पीड बोटचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना जेएपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्याबाबत सूचना केल्या होत्या. याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे.

जेएनपीएने १० वर्षांच्या कालावधीसाठी २ स्पीड बोटींच्या ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० खर्चाच्या निधीला २० डिसेंबर रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. या स्पीड बोट प्रवासासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. या स्पीड बोट सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. याचा फायदा सागरी मार्गाने प्रवास करणाऱ्यांना होणआर आहे. जेएनपीएचे कामगार, कुटुंबीय, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ, पोर्ट युजर्सच्या कामागारांठी होणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply