Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; करमुसे मारहाण प्रकरणातील तपास ३ महिन्यात पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अनंत करमुसे मारहाण प्रकरणात परत तपास करावा अशी मागणी करमुसे यांनी केली होती. त्यावर सुप्रिम कोर्टात ही मागणी मान्य करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने 3 महिन्यात संपूर्ण तपास करावा. तसेत तीन महिन्यात हे प्रकरण संपवा असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बाबत अनंत करमुसे यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणी आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता.

उच्च न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतर करमुसे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आज सुप्रीम कोर्टात यावर तीन महिन्यांत संपूर्ण तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

अनंत करमुसे यांच्यावर पोलिसांकडून दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. मात्र तपास कामात सहकार्य न केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून त्यांनी दाखल केलेली याचिका स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

अनंत करमुसे यांनी 5 एप्रिल 2020 रोजी जितेंद्र आव्हाडांविरोधात सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांचे अपहरण केले. तसेच आपल्या निवासस्थानी त्यांना आणून बेदम मारहाण केली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी आता करमुसे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply