Jejuri Somvati Amavasya : यळकोट यळकोट जयमल्हार! सोन्याच्या जेजुरीत सोमवती यात्रेचा उत्साह; गडावर लाखो भक्तांची गर्दी

Jejuri Gad Khandoba Yatra 2023: अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या मंदिरात आज सोमवती यात्रेचा उत्साह पाहायला मिळत आहे. जेजुरीच्या खंडेरायाची सर्वात मोठी यात्रा या सोमवती अमावस्येला भरत असते. या यात्रेला कालपासूनच राज्यभरातील भाविकांनी गर्दी केली असून २ ते ३ लाख भाविक जेजुरीत दाखल झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्याजेजुरी गडावर आज सोमवतीअमावस्या यात्रा साजरी होत आहे. या यात्रेनिमित्त राज्यातून नव्हे तर परराज्यातून हजारो भाविक जेजुरी नगरीमध्ये दाखल झाले आहेत. आज दुपारी एक वाजता खंडोबा देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी गडावरून पालखीचे प्रस्थान झाले.

Khadakwasla Project : खडकवासला प्रकल्पांत ४.१६ टीएमसी पाणीसाठा; पाणलोट क्षेत्रात तुरळक पाऊस

भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या भक्तीभावाने हा पालखी सोहळा सुरू झाला. हा पालखी सोहळा कऱ्हा नदीकडे मार्गस्थ झाला असून या ठिकाणी उत्सव मुर्तींना स्नान घालण्यात येते. सकाळपासून भाविकांनी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.

या क्षणाला भंडारा उडवतं मोठ्या उत्साहाने खंडोबाचं नाव घेतात. यळकोट यळकोट जय मल्हार या घोषणांनी भाविक मोठ्या आंनदाने हा क्षण साजरी करतात. खंडोबारायाच्या जेजूरी गडावर सोमवती यात्रेला विशेष महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मांच्या परंपरेनुसार जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा पाहायला आहे. या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply