Jejuri : येळकोट येळकोट जय मल्हार... जेजुरी गडावर भंडाऱ्याची मुक्त उधळण; Somvati Amavasya निमित्त लाखाे भाविक दाखल

Somvati Amavasya 2023 : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी करण्यात येते. यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविक जेजुरी गडावर दाखल झाले आहेत.

भंडाऱ्याच्या उधळणीनं संपूर्ण जेजूरी  गड न्हाऊन निघाला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. सकाळी सात वाजता पालखीचे कऱ्हा स्नानासाठी प्रस्थान झाले. यावेळी भांडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली.

अकरा वाजता पालखी  कऱ्हा स्नानासाठी कऱ्हा नदीमध्ये पोहचणार आहे. कऱ्हा स्नान होईल. या निमित्त भाविकांचा उत्साह उदंड असल्याचे चित्र जेजुरी गडावर आहे. काेविडच्या संकटानंतर प्रथमच साेमवती अमावस्या निमित्त भाविक गडावर दाखल झाले आहेत. येळकोट येळकोट जय मल्हार या घाेषणांनी गड दुमदुमन गेला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply