Jaykumar Gore Accident : कठडा तोडून गाडी नदीपात्रात कोसळली; गोरेंच्या डोक्याला गंभीर दुखापत

पुणे- भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला आज पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात गोऱे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहे. गोरे यांच्यासह गाडीत चार लोक होते. त्यापैकी दोघांवर बारामती येथे उपचार सुरू आहेत. गोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. फलटनजवळ हा अपघात झाला. 

दरम्यान गोरे यांच्यावर रुबी हॉलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. पहाटे पावनेतीन वाजेच्या सुमारास गोरे आपल्या मतदारसंघाकडे निघाले होते. मात्र रस्त्यात काळाखाच्या ठिकाणी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर गाडी ५० फूट खोल नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात गाडी चौघेजण जखमी झाले आहे. जयकुमार गोरे हे मान खटावचे आमदार आहेत.

भीषण अपघातात गोरे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. काही वेळातच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील रुग्णालयात भेट देणार आहेत. तर आमदार राहुल कुल रुग्णालयात पोहोचले आहेत. गोरे यांच्या अपघातातनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली आहे. तर अनेकजण अपघातस्थळी पोहोचले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply