Jayant Patil : ''मी गरीब माणूस, माझा कुणाशीही वाद नाही'', अंतर्गत कलहाच्या चर्चांवर जयंत पाटील काय म्हणाले?

Jayant Patil : 'राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिराला आमदार रोहित पवार यांची अनुपस्थिती असल्याने पक्षांतर्गत कुजबुज सुरु झाली आहे. त्यावरुन जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं असून माझा कुणाशीही वाद नाही, असं म्हटलं आहे. 

रोहित पवार हे परदेशात गेल्याने बुधवारी शिबिराला अनुपस्थित होते. त्यामुळे पक्षात रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील असा वाद सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पवारांच्या अनुपस्थितीबद्दल जयंत पाटील म्हणाले की, रोहित पवार हे परदेशात गेले आहेत. त्यामुळे ते आज किंवा उद्या उपस्थित राहतील.

Chhatrapati Sambhaji Nagar : आठ महिन्यांच्या बाळाला रुग्णालयात सोडून आई पसार; संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

पाटील पुढे म्हणाले, मी गरीब माणूस आहे. माझा कुणाशीही वाद नाहीये. जे बरोबर येतील त्यांच्यासोबत काम सुरु आहे. दरम्यान, सध्या राजकीय वर्तुळामध्ये रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्याबद्दल कुजबुज सुरु झाली.

यावरुन प्रतिक्रिया देताना अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, सध्या राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे कोण कधी बाहेर पडेल, हे सांगता येत नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पक्षामध्ये येण्यासाठी अनेक नेते रांगेमध्ये आहेत. राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या या विवादांमुळे नेमकं काय सुरुय? असा प्रश्न उपस्थित होतोय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *