Jayant Patil : ईडीकडून जयंत पाटील यांची साडेनऊ तास चौकशी; कार्यालयातून बाहेर पडताच दिली पहिली प्रतिक्रिया

Jayant Patil : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीने समन्स पाठवल्यानंतर आज मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते. आज ईडीकडून जयंत पाटील यांची साडे नऊ तास चौकशी झाली. ईडीकडून चौकशी झाल्यानंतर कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले. 

ईडीकडून कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जयंत पाटील म्हणाले, 'आज तुम्ही दिवसभर थांबला. महाराष्ट्रातील गावातून येथे येऊन दिवसभर समर्थन दिलं. माझ्यावर प्रेम व्यक्त केलं. पक्षाला समर्थन दिलं. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहे'.

'ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिले आहेत. ईडीकडे आता कोणतेही प्रश्न शिल्लक नसतील. नागरिक म्हणून मी कर्तव्य पूर्ण केलं आहे. दिवसभरात मी अर्ध पुस्तक वाचून काढलं आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, जयंत पाटील कार्यलयाच्या बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नव्हता. जयंत पाटील हे हसतमुख चेहऱ्याने बाहेर येत कार्यकर्त्यांचे आभार मानले.

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यावर करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply