Jayant Patil : जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Jayant Patil : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील यांच्या मागे ईडीचं सत्र सुरू झालं आहे. आज पुन्हा एकदा जयंत पाटलांना ईडीकडून समन्स बजावण्यात आला आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २२ मे रोजी सोमवारी चौकशीला हजर राहण्याच्या सूचना ईडीकडून जयंत पाटलांना देण्यात आल्या आहेत. जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. कथित IL and FS घोटाळ्या प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे.

राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात ११ मे रोजी निकाल जाहीर करण्यात आला. त्याच दिवशी सकाळी जयंत पाटलांना ईडीची नोटीस आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावेळी होणाऱ्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी पाटलांनी दर्शवली. त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. दरम्यान आज पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावत त्यांना २२ मे रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थीत राहण्यास सांगितलं आहे.

जयंत पाटील यांना आयएल आणि एफएलएस प्रकरणी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून आर्थिक मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप जयंत पाटील यांच्यावर करण्यात आला होता. आयएलएफस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचीही ईडीने चौकशी केली होती. यात मनी लाँड्रिंग झालं आणि पोलिसांनी यात गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अनेक नावे समोर आली होती. त्यात जयंत पाटील यांच्याही नावाचा समावेश आहे. त्यामुळेच ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली आहे. अशात आता पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावल्याने जयंत पाटील यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply