Kathua Encounter: जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, 'जैश'च्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा, ४ जवान शहीद


Jammu Kashmir Kathua Encounter : जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir Encounter) कठुआमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक उडाली. मागील तीन दिवसांपासून या ठिकाणी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. भारतीय जवानांनी जैश संघटनेच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत (Jammu Kashmir Encounter) भारताचे चार जवान शहीद झाले आहे, तर ५ जवान गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावर लष्कराच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्येसातत्याने दहशतवादी हल्ल्याच्या घटना घडत आहेत. कठुआमध्ये २३ मार्चपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Kathua Encounter) सुरूच आहे. या चकमकीत ४ जवान शहीद झाले असून ५ जण जखमी झाले. तसेच या चकमकीत ५ दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले आहे.

 

आणखी काही दहशतवादी कठुआतील जुठाणा येथील जंगलात लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लष्काराने जंगलात शोध मोहीम तीव्र सुरू केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांना गावकऱ्याने दिली माहिती -

दहशतवादी लपल्याची माहिती रविवारी हिरानगर येथील एका गावकऱ्याने दिली होती. त्यांना पकडण्यासाठी लष्कराने मोठी शोध मोहिम राबवली होती. तेच पोलीस कठुआच्या जंगलात लपले होते. त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. चकमकीच्या ठिकाणी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply