Jammu & Kashmir Blast : जम्मूच्या नरवालमध्ये दोन शक्तीशाली स्फोट; ७ जण गंभीर जखमी

जम्मू आणि काश्मीरमधील जम्मूच्या नरवाल भागात शनिवारी एकामागून एक दोन शक्तीशाली स्फोट झाले असून यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. अर्ध्या तासाच्या फरकानं हे स्फोट झाले आहेत. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पहिला स्फोट झाला यामध्ये पाच जण जखमी झाले.

राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' जम्मूमध्ये दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर हे स्फोट झाल्यानं सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यानंतर अर्ध्या तासाच्या फरकानं दुसरा स्फोट झाला यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. या स्फोटाच्या घटनांनंतर संपूर्ण भागात नाकेबंदी करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या स्फोटासाठी महिंद्रा बोलेरे या वाहनाचा वापर करण्यात आला होता.

सुहैल इक्बाल (वय ३५), सुशील कुमार (वय २६), विशाल प्रताप (वय २५), विनोद कुमार (वय ५२), अरुण कुमार तर अमित कुमार (वय ४०) आणि राजेश कुमार (वय ३५) अशी जखमी झालेल्या लोकांची नावं आहेत.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये सुरु आहे. यामध्ये शेकडो लोग सामील झाले आहेत. यापार्श्वभूमीवर हे दोन स्फोट झाल्यानं ही बाब गंभीर समजली जात आहे. त्यामुळं या घटनेनंतर सीआरपीएफ, आर्मी तसेच स्थानिक जम्मू आणि काश्मीर पोलीस अॅलर्ट मोडवर आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply