Jalna News : शिक्षक द्या, विद्यार्थ्यांची आर्त हाक; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन

Jalna News : शाळा आहे, शिकायला येणारे विद्यार्थीपण आहेत. मात्र त्यांना शिकवायला शिक्षक नाही. अशी परिस्थिती भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी  शिक्षक मिळावेत यासाठी आंदोलन केले आहे.

रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या. शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे. मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदन प्रशासनाकडे देण्यात आली आहेत. यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील केली आहेत. परंतु अद्यापही दखल न घेतल्याने पालकांच्या वतीने नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशीच जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरो आंदोलन करण्यात आल आहे. 

Supriya Sule : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद 

भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले असून जिल्हाधिकारी प्रवेश द्वाराजवळ येताच विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दालनात बोलवून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि अडचणी समजाऊन घेतल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply