मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस 25 जूनला जालना दौऱ्यावर; 'शासन आपल्या दारी'च्या कार्यक्रमात लावणार हजेरी

Jalna : शिंदे फडणवीस सरकारच्या वतीने राज्यभरात “शासन आपल्या दारी” अभियान राबवले जात आहे. विशेष म्हणजे या अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात सभा देखील घेतल्या जात आहे. दरम्यान शासन आपल्या दारी अभियानातंर्गत मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात देखील सभा आयोजित करण्यात आली आहे. 25 जून रोजी ही सभा होणार आहे. त्यामुळे यासाठी प्रशासनाकडून नियोजन बैठकांचं धडका पाहायला मिळत आहे. 

शासन आपल्या दारी अंतर्गत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जालन्यात नियोजितकार्यक्रमाबाबत पूर्वतयारी बैठक संपन्न झाली आहे. शासन आपल्या दारी या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जालना शहरात 25 जून रोजी कार्यक्रम पार पडणार आहे. तर याच नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबत सोमवारी केंद्रीय रेल्वे, कोळसाव खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. तर जिल्हा परिषदेतील कै. यशवंतराव चव्हाणसभागृहात आयोजित या बैठकीस आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटेआदींसह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,  जिल्हापरिषद अंतर्गत येणारे सर्व विभाग व तालुका, ग्रामस्तरावरील सर्व अधिकारी,कर्मचारी, कृषी, महसूल व इतर सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.        

“शासन आपल्या दारी”अभियानातंर्गत प्राप्त लाभार्थ्यांना थेट विविध शासकीय योजनांचा लाभ, महत्त्वाची कागदपत्रे, प्रमाणपत्र देण्यात येतात. सध्या राज्यभर असे अभियानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून जालना शहरातील नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील  पांजरपोळ मैदान येथे 25 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रशासनाच्यावतीने नियोजित भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

रावसाहेब दानवेंच्या बैठकीत सूचना...

दरम्यान या कार्यक्रमाच्या अनुषंगाने दानवे यांनी बैठकीत विविध सूचना केल्या. कार्यक्रमस्थळी  उपस्थित लाभार्थी, नागरिक यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, याची संबंधित विभागांनी दक्षताघ्यावी. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या विविध योजनांच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी कार्यक्रमस्थळी स्टॉल लावावेत. नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन द्यावी. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी करावा, अशा सूचना दानवेंनी यावेळी दिल्या. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply