Jalna Accident News : भरधाव कार थेट जायकवाडीच्या कालव्यात कोसळली; आडत व्यापाऱ्याचा दुर्देवी मृत्यू

Jalna Accident News : जालना जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. अंबड तालुक्यातील तीर्थपुरीजवळ जायकवाडीच्या डाव्या कालव्यात कार कोसळून आडत व्यापार्‍याच्या दुर्देवी मृत्यू झाला आहे. नंदू सोनाजी राजगुरू असं मृत्युमुखी पडलेल्या आडत व्यापाऱ्यांचे नाव असून ते अंबड तालुक्यातील रुई गावचे रहिवाशी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थपुरी येथील बाजार समितीच्या यार्डात कापूस व भुसार माल खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. आज ते रुई गावातून दुपारी १ वाजेच्या सुमारास भार्डी मार्गे तीर्थपुरीकडे येत होते. भार्डी गावाजवळ असलेल्या अचानकनगर या ठिकाणाहून वाहणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या काळव्याजवळ त्यांचं कार वरील नियंत्रण सुटले आणि त्यांची कार डाव्या कालव्यात जाऊन कोसळली.

या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने कार कालव्याच्या बाहेर काढली. मात्र, तोपर्यंत नंदू राजगुरू यांचा मृत्यु झाला होता. दरम्यान, नंदू राजगुरू यांच्या आडत दुकानात तीर्थपुरी व परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी शेकडो क्विंटल सोयाबीन आगाऊ जमा करून ठेवलेले आहेत.

जेव्हा भाव वाढेल त्यावेळेस सोयाबीनचे पैसे देण्याच्या अटीवर ही सोयाबीन नंदू यांनी शेतकऱ्याकडून खरेदी करून ठेवल्याची माहिती ही समोर येत आहे. त्यातच राजगुरू यांच्याकडे अनेक लोकांचे हातउसने पैसे ही असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राजगुरू यांच्याकडे लाखो रुपयांची देणी असल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हा अपघात की आत्महत्या अशा विविध चर्चाना परिसरात उधाण आलं आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply