Jalna Accident : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबावर काळाचा घाला; चौघांचा मृत्यू, उभ्या ट्रकला कार धडकून भीषण अपघात

Jalna Accident : नवीन वर्षाची सुरवात होत असताना कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. जालन्यातील सोलापूर- धुळे महामार्गावर महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

नवीन वर्षाची सुरवात झाली असून नववर्षाच्या पहाटेची सुरवात दुःखद घटनेने झाली आहे. नववर्षानिमित्ताने अक्कलकोटवरून गणपूरला जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन चार भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली होती. यानंतर जालना जिल्ह्यात दुपारच्या सुमारास अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक

Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट, दिल्ली-NCR मध्ये दाट धुके आणि बर्फवृष्टी

सोलापूर- धुळे महामार्गावर महाकाळा येथे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. यात महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार मध्ये सहा जण होते. यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना दाखल केले रुग्णालयात

दरम्यान घटनास्थळी जालन्यातील गोंदी पोलीस दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये मृत झालेले चौघेजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply