Jalna Crime : शेताच्या बांधावरून वाद; जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण; ११ जणांवर गुन्हा दाखल

Jalna : शेत जमिनीवरून असलेल्या जुन्या वादातून एका तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सातेफळ गावात घडली आहे. मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला आहे. सदर घटनेत संशयित ११ जणांविरोधात जालन्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातील सातेफळ शिवारात शेतातील बांधावरून गावातील दोन कुटुंबांमध्ये वाद सुरु आहेत. या वादावरून १० ते ११ जणांच्या टोळक्याने एका २९ वर्षीय युवकाला शेतातच बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सोमीनाथ वाघ असं मारहाण झालेल्या युवकाचे नाव असून शेतामधील बांधाच्या वादावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता. हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला होता.

Alibaug : अलिबागजवळ बोटीला भीषण आग, १८-२० प्रवासी अडकल्याची भीती

वादाचे रूपांतर हाणामारीत

दरम्यान शेतात सोमनाथ वाघ असतांना बांधावरून समोरच्यांशी पुन्हा एकदा वाद उफाळून आला. या वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झालं. यावेळी जमलेल्या दहा ते अकरा जणांनी मिळून सोमनाथ यास बेदम मारहाण केली. या मारहाणीत सोमनाथ हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अकरा जणांवर गुन्हा दाखल

दहा ते अकरा जणांनी या युवकाला बेदम मारहाण केली. दरम्यान सदर प्रकरण पोलिसात गेले असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. तर जालन्यातील टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या संशयित ११ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply