Jalna crime : चोर समजून जमावाची तिघांना लाठी-काठीने बेदम मारहाण; तिघे गंभीर जखमी

 

Jalna : मागील काही दिवसात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे गावांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान गावात काही सामान विक्रीसाठी आलेल्या तिघांना गावातील नागरिकांनी बेदम मारहाण केली. चोर असल्याचे समजून लाठ्या- काठ्या व पट्ट्याने मारहाण करण्यात आल्याने तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यात घडली आहे.

जालना जिल्ह्यातल्या गुळखंड तांडा येथे सदरची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. दरम्यान शहर व गावांमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भंगार घेणारे किंवा काही साहित्य विक्री करण्याच्या निमित्ताने फेरफटका मारून बंद घरांची टेहळणी करत असतात. यानंतर रात्री बंद घरातून चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे गावात कोणी साहित्य विक्रीसाठी नवीन आल्यास त्याच्यावर सहज संशय घेतला जात असतो. यातूनच हा प्रकार घडला आहे.

Gold Price Today : वर्षाच्या शेवटी ग्राहकांसाठी खुशखबर! सोन्याच्या भावात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचा दर

चोर असल्याचे म्हणत मारहाण

दरम्यान जालना जिल्ह्यातील गुळखंड तांडा या गावात फिर्यादी इंदर कुमार साह हा त्याच्या दोन साथीदारसह भांडे घासायचे पावडर विकण्यासाठी गुळखंड तांडा येथे आले होते. मात्र गावात प्रवेश केल्यानंतर गावातील काही जणांनी त्यांच्यावर संशय घेतला. यानंतर दोघांनी गावातील लोकांची गर्दी जमवून तुम्ही चोर आहात; असं म्हणत काहीही विचार न करता पावडर विक्रीसाठी आलेल्या तिघांना लोखंडी पाईप, दगड आणि लाकडी दांड्यांनी बेदम मारहाण केली.

४५ जणांवर गुन्हा दाखल

गावातील साधारण ४० ते ५० जणांनी मिळून मारहाण केल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या प्रकरणी परतूर पोलिसात ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply