Jalgaon News : तळोदा- बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्गामुळे जमीन जाणार; संतप्त शेतकऱ्यांकडून चक्काजाम

Jalgaon News :  तळोदा बऱ्हाणपूर प्रस्तावित महामार्ग रद्द करावा. तसेच पूर्णाड व अंतूर्ली फाट्यावरील उड्डाणपूल रद्द करावा, यासाठी परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. दरम्यान संतप्त शेतकऱ्यांचे महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवरील अंतुर्ली फाट्यावर रास्ता रोको आंदोलन केले. 

तळोदा- बऱ्हाणपूर या प्रस्तावित महामार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांसह बागायती धारक शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्गात जाणार आहेत. या विरोधात जळगाव जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर रास्ता रोको आंदोलन करून प्रस्तावित महामार्ग रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलेल्या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 

Solapur Accident News : भीषण अपघात! भरधाव दुचाकी झाडावर आदळली; ३ जिवलग मित्र जागीच ठार

महामार्गावर लागल्या रांगा 

दरम्यान महाराष्ट्र- मध्य प्रदेश सीमा शेतकऱ्यांनी रोखून धरले. सकाळी हे आंदोलन उभारत सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन झाल्याने बऱ्हाणपूर मुक्ताईनगर या महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply