Jalgaon : अमळनेरच्या युवकाचं इनोव्हेशन देशातील डिजिटल क्रांतीला गती देणार; GrowHo प्रकल्पाचं राज्यपालांकडून कौतुक

Jalgaon : “अमळनेरच्या युवकाचे इनोव्हेशन देशात डिजिटल क्रांती घडवणार – नागरिकांना आधुनिक डिजिटल सोल्यूशन्स, तर स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी” GrowHo चे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री सचिन बिऱ्हाडे यांनी आज राजस्थानचे राज्यपाल मा. हरीभाऊ बागडे (नानाजी) यांची राजभवन, जयपूर येथे सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान सचिन यांनी GrowHo Digital Rajasthan Project संदर्भात सविस्तर माहिती राज्यपाल महोदयांसमोर मांडली. प्रकल्पात ग्रामीण आणि शहरी नागरिकांसाठी उपलब्ध सर्व डिजिटल सेवांचे संपूर्ण डिजिटायझेशन, ग्रामपंचायतींमध्ये स्मार्ट डिजिटल सुविधा सक्षम करणे, तसेच शासनाच्या विविध सेवांची नागरिकांपर्यंत जलद, अचूक आणि प्रभावी डिजिटल पोहोच यावर चर्चा झाली.

Pune Cyber Crime : पुणेकरांना सायबर ठगांचा फटका; एकाच दिवशी ११ गुन्हे, कोट्यवधींची फसवणूक

GrowHo कंपनी राजस्थानमध्ये घरगुती डिजिटल सेवा, स्मार्ट ग्रामपंचायत प्रकल्प, डिजिटल दस्तऐवज सेवा, तसेच शासन सेवांचे सिंगल-विंडो डिजिटायझेशन यांसारखे अन्य बरेच उपक्रम राबविणार आहे. या अभिनव प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी GrowHo कडे १५०+ आयटी तज्ञांची अत्यंत कुशल टीम कार्यरत आहे, जी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने देशाला डिजिटलदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी सज्ज आहे.

राज्यपाल महोदयांनी GrowHo च्या संकल्पनेचे कौतुक करत,
“राज्यातील डिजिटल सक्षमीकरणासाठी हा अत्यंत उपयुक्त आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रकल्प ठरेल,” असे प्रतिपादन केले.

श्री सचिन बिऱ्हाडे यांनी सांगितले की—
“GrowHo चे ध्येय म्हणजे शासनाच्या सर्व डिजिटल सेवा घराघरात पोहोचवणे, ग्रामीण व शहरी विभाग स्मार्ट बनवणे आणि नागरिकांची तंत्रज्ञान वापरण्याची प्रक्रिया अधिक सोपी व प्रभावी करणे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *