Jalgaon News : जळगावात राजपूत समाज एकवटला; राजपूत समाजाचे आमरण उपोषण,आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Jalgaon News : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या राजपूत समाजाचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राजपूत समाजातर्फे आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. राजपूत समाजाला मिळणारे आरक्षण, सरसकट जात प्रमाणपत्र मिळावे, राजपूत समाजासाठी महामंडळ असावे अशा अनेक मागण्या आंदोलकांच्या आहेत.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना केल्या होत्या त्या सूचना अद्यापही पाळल्या जात नाही येत त्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्याचे संकट मोचक असलेले गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ला असलेल्या जळगावतच हे राज्यव्यापी आंदोलनातून महाजन हे नेमके हे आमरण उपोषण थांबवण्यात यशस्वी ठरतात का हा प्रश्न येणारा काळच ठरवेल.. गिरीश परदेशी हे समाजाच्या वतीने आमरण उपोषण करीत आहेत आंदोलन करणाऱ्या या आंदोलकांची नेमकी काय भूमिका आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply