Jalgaon : मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी! ४ जखमी, ४५ जण ताब्यात

जळगाव जिल्ह्यात नमाज सुरू असताना मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी ४५ जणांना ताब्यात घेतले आहे. 

आम्ही आतापर्यंत ४५ जणांना अटक केली आहे. या हिंसाचारात ४ जण जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती शांततापूर्ण असून परिसरात नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली आहे. 

दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काल रात्री दोन गटात राडा झाला. यावेळी दंगलखोरांनी अनेक वाहने जाळली. किराडपुरा परिसरात हा राडा झाला. लोकांनी एकमेकांवर दगडफेक केली आणि राम मंदिराबाहेर डझनभर वाहने जाळली. प्रचंड तोडफोड झाली. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. 

परिसरात तणाव पसरला असून, तो वाढू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन तरुणांमध्ये भांडण झाल्याने हे प्रकरण दोन गटांमध्ये पसरले. दंगलखोरांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply