Jalgaon Fire News : जळगावमध्ये अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग, 4 जण अडकल्याची भीती

Jalgaon Fire News : जळगाव एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत चार जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

मोरया केमिकल कंपनीला सकाळी नऊच्या सुमारास ही आग लागलीये. आग लागल्यानंतर कंपनीत केमिकलचा मोठा स्फोट झाला. घटना घडली तेव्हा कही कामगार येथे काम करत होते. या घटनेमुळे काही कर्मचारी जखमी झाले आहेत. तर कंपनीत काम करणारे चार कर्मचारी कंपनीमध्ये अडकल्याची भीती आहे.

Raj Thackeray : काही पक्षांनी श्रीरामाचे अस्तित्व नाकारलं; राज ठाकरेंची रामनवमी दिनी सोशल मीडियावर पोस्ट

घटनेची माहिती मिळताच जळगाव अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झालेय. तीस ते चाळीस अग्नीशमन दलाची वाहाने घटनास्थळी दाखल झाली आहेत. मात्र अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.

केमिकलचा स्फोट होत असल्याने आग आणखी वाढतच चालली आहे. आगीचे लोट हवेत दूरवर पसरलेत. आग अटोक्यात येत नसल्याने आसपासच्या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply