Jalgaon Crime : सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत जळगावमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, लाखोंचं सोनं लंपास

Jalgaon Crime :  जळगाव शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर आज पहाटेच्या सुमारास दरोडा घालत लाखो रुपयांचे सोने लुटून नेल्याची घटना घडली. यामुळे जळगावमध्ये  मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत दरोडा घालणारे सहा दरोडे खोर हे सराफ बाजारातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले झाले आहे. पोलीस  दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहराच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सौरभ ज्वेलर्समध्ये पहाटेच्या वाजताच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. दुकानातील शोरूम मधील लाखो रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. 

Bangalore News : पान खाण्याचा मोह जिवावर बेतला; 'स्मोकी पान' खाल्ल्याने १२ वर्षाच्या मुलीच्या पोटात झालं छिद्र

सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवत ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा

यावेळी दरोडेखोरांनी दुकानातील तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश मिळालं नाही. त्यामुळे कोट्यावधी रुपयांचे सोने बचावले आहे. दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करण्यापूर्वी दुकानाबाहेरील सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक देऊन आणि जिवे मारण्याची धमकी देत गप्प केल्याचे दुकान मालक सौरभ कोठारी यांनी म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply