Jalgaon Accident : किर्तन आटोपुन परततांना किर्तनकाराचा मृत्यु; गॅस टँकरची दुचाकीला धडक

Jalgaon Accident : पाचोरा येथे आयोजित कार्यक्रमात कीर्तन करून घरी जात असताना गॅस ट्रॅकरने धडक दिल्याने कीर्तनकार महाराजांचा मृत्यू झाल्याची घटना  जळगाव- पाचोरा मार्गावर रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

खर्डी (ता. चोपडा) येथील कैलास प्रकाश कोळी (वय २२) असे अपघातात मृत्यू झालेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. कैलास कोळी हे कुटुंबीयांसह खर्डी गावात वास्तव्यास होते. प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख होती. कीर्तन करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान २३ डिसेंबरला त्यांचे पाचोरा येथे कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री ११ वाजेपर्यंत कीर्तन चालले. यानंतर ते दुचाकीने जळगाव येथे येत असताना जळगाव शहरा नजीकच्या रात्री १२.३० वाजता गॅसच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कीर्तनकार कैलास कोळी यांचा जागेवरच मृत्यू झाला. 

Ajit Pawar News : अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार होते? अजित पवारांचा खळबळजनक खुलासा

अपघात  घडल्यानंतर नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. दुसऱ्या दिवशी (२४ डिसेंबर) शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन विवाहित बहीण आणि असा परिवार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply