Jalgaon Accident : दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेले, पण काळाने घातली झडप; जळगावातील शिक्षकाचं अख्खं कुटुंब संपलं

Jalgaon Accident : दिवाळीच्या सुट्टीत फिरायला गेलेल्या जळगाव जिल्ह्यातील दोन शिक्षक कुटुंबियांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही कुटुंबियातील प्रत्येकी ३ अशा ६ जणांचा मृत्यू झाला. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास राजस्थानमध्ये घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. 

धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा सोनवणे (वय ५०), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (वय ५) गायत्री योगेश साळुंखे (वय ३०), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय १) अशी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. कार कंटेनरवर धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

Maratha Aarakshan : ऐन दिवाळीत मराठा आरक्षणाचा चौथा बळी; चिठ्ठी लिहित तरुणाने संपवलं जीवन

मृत शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय अमळनेर तालुक्यातील रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे आणि योगेश धोंडू साळुंखे या दोन्ही शिक्षकांचे कुटुंब कारने राजस्थान फिरायला गेले होते.

दोन्ही कुटुंब राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना सोमवारी दुपारी पावणे तीन वाजता बारमेर रस्त्यावर त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. डोरीमना गावाजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तकारने एका कंटेनरला धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये कारमधील धनराज सोनवणे, त्यांची पत्नी सुरेखा धनराज सोनवणे, मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे तर योगेश साळुंखे यांची पत्नी गायत्री योगेश साळुंखे, त्यांचा मुलगा प्रशांत योगेश साळुंखे, आणि मुलगी भाग्यलक्ष्मी साळुंखे जागीच मृत्यू झाला.

तर सुरेखा ह्या जखमी होत्या. त्यांची रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली आहे. ऐन दिवाळीत शिक्षक कुटुंबीयावर काळाने घाला घातल्याने अमळनेर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे सर्व मृतदेह धोरिमान्ना हॉस्पिटलच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply