Gold-Silver Price Hike: सोनं-चांदीला पुन्हा लखाखी! ६ दिवसांत सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ, चांदीही महागली

Jalgaon : लग्नसराईसाठी सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोनं-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोनं-चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली होती. पण त्यानंतर पुन्हा सोनं-चांदीच्या दरात वाढ होण्यास सुरूवात झाली आणि ती वाढ अजूनही सुरूच आहे. गेल्या सहा दिवसांत सोनं २,१०० रुपयांनी वाढले. तर चांदीच्या भावातही हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या भावावर होताना दिसत आहे. अमेरिकेने भारतावर आयात शुल्क लावल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव घसरले होते. आता काही दिवसांसाठी अमेरिकेने भारतावर लावलेल्या आयात शुल्काला ब्रेक दिला. यामुळे पुन्हा सोनं-चांदीच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

KEM Hospital : मांडीवर अन् पाठीवर हात टाकला, वरिष्ठ डॉक्टरावर ६ महिला डॉक्टरांचा विनयभंगाचा आरोप

जळगावच्या सराफा बाजारामध्ये गेल्या सहा दिवसांत सोन्याच्या भावात २ हजार १०० रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायाला मिळत आहे. तर चांदीच्या भावातही १ हजारांची वाढ झाली आहे. गेल्या शनिवारी सोन्याच्या भावात ८०० रुपयांची वाढ होऊन सोने ९३ हजार २०० प्रतिदहा ग्रॅम (विनाजीएसटी) झाले. शुक्रवारी तब्बल सहा दिवसांनी सोन्याच्या भावात २ हजार १०० रुपयांची वाढ होऊन सोनं ९५ हजार ३०० प्रतिदहा ग्रॅम (विनाजीएसटी) पर्यंत पोहचले.

तर, १२ एप्रिलला चांदीच्या भावात १ हजार ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ९६ हजार (विनाजीएसटी) पर्यंत पोहोचली होती. शुक्रवारी चांदीतही किलोमागे (विनाजीएसटी)१ हजारांची वाढ होऊन चांदी ९७ हजार प्रतिकिलो (विनाजीएसटी) पर्यंत पोहोचली. सोनं-चांदीच्या दरात सतत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी आहे. कारण सोनं-चांदी खरेदी करताना त्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply