Accident News : वाहनाच्या धडकेत २० फूट फेकले गेले; मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Jalgaon : दुचाकीने जात असलेल्या पिता- पुत्राला भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत पिता पुत्र २० फूट अंतरापर्यंत झुडपात फेकले गेले. यात १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार वडील गंभीर जखमी झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ घडला.

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ झालेल्या अपघातात अमीर रामा चारण (वय १३) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान मध्य प्रदेशच्या उदयपूर येथील मूळ रहिवासी असलेले रामा किसन चारण (वय ६५) हे कामानिमित्ताने दुचाकीने निघाले होते. दरम्यान रामा चारण व त्यांचा मुलगा अमीर हे उदयपूर येथून धुळे येथे कामानिमित्त निघाले असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला.

पिंपळकोठा गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये पिता- पुत्र रस्त्याच्या कडेला झुडपांत फेकले गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यात मुलगा अमीर चारण याचा जागीच मृत्यू झाला. तर, रामा चारण हे गंभीर जखमी आहे. अपघात घडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी रामा यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर अमीरचा मृतदेह जळगावच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला.

वाहन चालक फरार

दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक गाडी घेऊन फरार झाला आहे. धडक देणाऱ्या वाहनाचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान सुरुवातीला दोघांची ओळख पोलिसांनी पटविली. अमीर चारण याचा पंचनामा जळगाव तालुका पोलिसांनी केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply