Jalana News : 'देवेंद्र फडणवीस गो बॅक...' जालन्यात मराठा आंदोलक आक्रमक; काळे झेंडे दाखवत ताफा अडवण्याचा प्रयत्न

Jalana News : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असून याचा फटका राजकीय दौऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेत्यांना मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आज जालना दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न मराठा बांधवांनी केला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

मराठा आंदोलक आक्रमक

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे'वंदे भारत एक्सप्रेस'च्या उद्घाटनासाठी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बदलापूर शहरात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दिसताच त्याला काळे झेंडे दाखवले.

Narendra Modi : '२२ जानेवारीला घराघरात दीपोत्सव साजरा करा'; अयोध्येतून PM नरेंद्र मोदींचं आवाहन

फडणवीस गो बॅकच्या घोषणा

तसेच 'देवेंद्र फडणवीस गो बॅक'च्या घोषणा देत निषेध व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना अडवले. याप्रकरणी पोलिसांनी बदलापूर  शहरातून चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply