Jalana News : आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा... बंजारा समाजाची मागणी; जालना- परभणी महामार्गावर 'रास्ता रोको'

Jalana News : राज्यात सध्या  मराठा आरक्षणाचा  मुद्दा चांगलाच तापला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा- बांधवांमध्ये संघर्ष सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी बंजारा समाजही रस्त्यावर उतरला आहे. आज (गुरूवार, २८ डिसेंबर) जालना ते परभणी महामार्गावर बंजारा समाजाकडून भव्य रास्ता रोको करण्यात आला.

विमुक्त जाती अ या प्रवर्गात मागच्या अनेक वर्षांपासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी केली आहे. त्यामुळं बंजारा समाजातील लाभार्थ्यांवर अन्याय होत असून शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात मोठे नुकसान होत असल्याचा आरोप बंजारा समाजाकडून करण्यात येत आहे.

Nylon Manja : नायलॉन मांजावर नाशिकमध्ये बंदी; थेट गुन्हा, हद्दपार, तडीपारीची कारवाई

याविरोधात गोर सेनेच्या वतीने जालन्यातील वाटूर येथे भव्य रास्ता रोको करण्यात आला. यावेळी आंदोलकांनी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवण्याच्या मागणीसाठी जालना परभणी महामार्ग रोखून धरत रास्ता रोको आंदोलन केले.

विमुक्त जाती अ मध्ये घुसखोरी करून खोटे प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या अधिकार्यांवर कारवाई करून त्यासाठी विशेष तपासणी पथकाची स्थापना करावी आणि बोगस प्रमाणपत्र रद्द करावे.. या मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply