ISRO Mission Aditya : चंद्रानंतर आता भारताची सूर्याला गवसणी; मिशन आदित्य एल1 चा मुहूर्त ठरला

Mission Aditya ISRO: चंद्रावर चांद्रयान-३ चे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचणाऱ्या इस्रोने आता एका नव्या मैलाच्या दगडाकडे पाऊल टाकले आहे. ISRO ने जाहीर केले आहे की ते 2 सप्टेंबर रोजी आदित्य-L1 मिशन लाँच करेल. श्रीहरिकोटा येथून सकाळी 11.50 वाजता प्रक्षेपित होईल.

लॉन्चिंग पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिकही नोंदणी करू शकतात. गॅलरीत बसून प्रक्षेपण पाहण्यासाठी इस्रोने आपल्या वेबसाइटवर नोंदणी लिंक देखील जाहीर केली आहे. इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ही पहिली भारतीय अंतराळ मोहीम असेल.

Talathi Exam 2023 : तलाठी भरती प्रक्रियेतील गोंधळाची मालिका सुरुच, मुंबईत उमेदवारांना परीक्षा न देताच परतावं लागणार?

या मिशनमध्ये हवामानाची गतीशीलता, सूर्याचे तापमान, अतिनील किरणांचा पृथ्वीवर होणारा परिणाम आणि ओझोन थर यांचा अभ्यास केला जाणार आहे. सूर्याचा अभ्यास करून हवामानाचा अंदाजही अधिक अचूक होईल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. यामुळे अशी यंत्रणा तयार होण्यास मदत होईल, ज्याद्वारे वादळाची माहिती तात्काळ मिळेल आणि त्याची सुचना देता येईल.

सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT), आदित्य L1 मोहिमेसाठी एक प्रमुख साधन, पुणे स्थित इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) ने विकसित केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *