IRS Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलै पर्यंत ED कोठडी!

IRS Sachin Sawant : वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. दरम्यान आज कोर्टाने त्यांना 5 जुलै पर्यंत ED कोठडी सुवावली आहे.  सचिन सावंत यांच्याविरोधात 500 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला असून ईडीने त्यांना अटक केली आहे. दरम्यान काल मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकला होता.

Udayanraje Vs Shivendraraje : साताऱ्यात राडा, भूमिपूजनापूर्वी ग्रामस्थांनी साहित्य फेकून दिलं; उदयनराजे - शिवेंद्रराजेंत जुंपणार?

मंगळवारी रात्री सीमाशुल्क आणि जीएसटी संवर्गाचे अतिरिक्त आयुक्त सचिन सावंत यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. तसेच मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. सचिन सावंत हे यापूर्वी ईडीच्या मुंबई विभागात कार्यरत होते. दरम्यान सचिन सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज त्यांना कोर्टात सादर करण्यात आले. यानंतर कोर्टाने त्यांना 5 जुलै पर्यंत कोठडी सुनावली आहे.

भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात मंगळवारी सचिन सावंत यांच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. हिरे व्यापाऱ्यांकडून ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम बेगायदेशीरित्या हस्तांतरित केल्याचा आरोप सचिन सावंत यांच्यावर करण्यात आली होती. या प्रकरणी एका आरोपीच्या तक्रारीनंतर हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं. त्यानंतर ईडीने देखील स्वतःच्याच अधिकाऱ्यावर कारवाई सुरू केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply