RCB कडे शेवटची संधी... आज हरली तर IPL मधून जाणार बाहेर; धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराबादशी सामना

RCB कडे शेवटची संधी...  सनरायझर्स हैदराबादचा संघ पॅट कमिन्सच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएलमध्ये धडाकेबाज खेळ करीत आहे. पहिल्या तीनपैकी फक्त एका लढतीत विजय मिळवल्यानंतर पुढील चारही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांना लोळवण्यात हैदराबादला यश मिळाले.

हैदराबादने चार वेळा दोनशेच्या वर, तर तीन वेळा अडीचशेच्या वर धावसंख्या उभारत प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. हैदराबादकडून विक्रमी धावांचा ओघ कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगळूरच्या संघाचा सात पराभवांनंतर पाय खोलात गेला असून आता यापुढील प्रत्येक लढत त्यांच्यासाठी आव्हान कायम राखण्यापेक्षा प्रतिष्ठा कायम राखण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणार आहे.

IPL 2024 Playoffs Scenario : RCB नंतर 'ही' टीम पण IPL मधून बाहेर... मुंबई-दिल्लीवरही टांगती तलवार? जाणून घ्या समीकरण

बंगळूरसाठी विराट कोहलीने (३७९ धावा) व हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने (३२४ धावा) धावांचा रतीब उभारला आहे. दोघांमधील रस्सीखेच यापुढेही कायम राहील. हेडच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर हैदराबादने दिल्लीविरुद्धच्या लढतीत पॉवरप्लेमध्ये विक्रमी धावसंख्या उभारली. अभिषेक शर्मा (२५७ धावा) हेडला सलामीला तोलामोलाची साथ देत आहे. हेनरिक क्लासेन (२६८ धावा) व एडन मार्करम (१६० धावा) या दक्षिण आफ्रिकन खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. क्लासेनने चमक दाखवली असून मार्करमला कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे.

गोलंदाजीत सुधारणा हवी

बंगळूरकडून सर्वाधिक विकेट यश दयाल याने मिळवलेले आहेत. त्याने सात फलंदाज बाद केले आहेत; मात्र यंदाच्या मोसमात सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सध्या तो २६व्या स्थानावर आहे (ही आकडेवारी बुधवार रात्रीपर्यंतची आहे). याचाच अर्थ बंगळूरचा गोलंदाजी विभाग कमकुवत आहे. मोहम्मद सिराज, कॅमेरुन ग्रीन, लॉकी फर्ग्युसन ही स्टार मंडळी अपयशी ठरली आहेत. कर्ण शर्मा, मयांक डागर व विल जॅक्स यांच्याकडूनही निराशा झाली आहे.

विराटला साथ हवी

बंगळूरसाठी आयपीएलचा मोसम अत्यंत वाईट ठरला असला, तरी इतर लढतींमध्ये विजय मिळवण्यासाठी त्यांचा संघ प्रयत्नशील असेल; पण फलंदाजी विभागात त्याला इतर फलंदाजांकडून साथीची गरज आहे. फाफ ड्युप्लेसी (२३९ धावा), दिनेश कार्तिक (२५१ धावा), रजत पाटीदार (१६१ धावा) यांनीही सातत्याने चमकदार खेळ करायला हवा. कॅमेरुन ग्रीन, विल जॅक्स, महिपाल लोमरोर यांनी दबावाखाली खेळ उंचावण्याची गरज आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply