IPL 2024 LSG vs RR : राजस्थानच्या 'बुलेट ट्रेन'ला लखनौचे 'नवाब' लावणार ब्रेक; काय असेल दोन्ही संघाची प्लेइंग-11?

IPL 2024 LSG vs RR  : राजस्थान रॉयल्सचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार खेळ करीत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानने आठपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवत प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. मागील तीन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करणारा राजस्थानचा संघ आज लखनौ सुपर जायंट्स संघाशी दोन हात करणार आहे.

याप्रसंगी विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी राजस्थानचा संघ प्रयत्नांची शिकस्त करील. विजयाच्या हॅट्‌ट्रिकचे लक्ष्य डोळ्यांसमोर असलेल्या लखनौच्या संघाचेही लक्ष्य प्ले-ऑफचे असणार आहे.कर्णधार संजू सॅमसन (३१४ धावा), रियान पराग (३१८ धावा), जॉस बटलर (२८५ धावा) या तीन फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. राजस्थानसाठी ही जमेची बाजू ठरत आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने धडाकेबाज शतकी खेळी साकारताना आपण फॉर्ममध्ये आल्याचे दाखवून दिले. यामुळे राजस्थानचा संघ फलंदाजी विभागात आणखी भक्कम झाला आहे. शिमरोन हेटमायर व रोवमन पॉवेल हे फलंदाजही राजस्थानच्या दिमतीला आहेत.

IPL 2024 KKR Vs PBKS : तांडव! 42 षटकार 37 चौकार अन् 523 धावा.... पंजाबचा विक्रमी विजय, कोलकत्याचा पराभव

राजस्थानचा फलंदाजी विभाग जितका तगडा आहे, त्यांचा गोलंदाजी विभागही तेवढाच प्रभावी आहे. युझवेंद्र चहल (१३ विकेट), ट्रेंट बोल्ट (९ विकेट), आवेश खान (८ विकेट), संदीप शर्मा (६ विकेट) हे गोलंदाज प्रभावी कामगिरी करीत आहेत. रवीचंद्रन अश्‍विनचा सुमार फॉर्म चिंतेचा विषय आहे, पण सध्यातरी राजस्थानवर याचा विपरित परिणाम झालेला नाही. प्ले-ऑफ लढतींच्या आधी तो फॉर्ममध्ये आल्यास राजस्थानसाठी ही आनंददायी बाब असणार आहे.

राहुल, पूरन, स्टॉयनिसमुळे फलंदाजी भक्कम

लखनौच्या फलंदाजी विभागाची मदार कर्णधार के. एल. राहुल (३०२ धावा), निकोलस पूरन (२८० धावा), मार्कस स्टॉयनिस (२५४ धावा) यांच्या खांद्यावर अवलंबून आहे. क्विंटॉन डी कॉक, दीपक हुडा, आयुष बदोनी व कृणाल पंड्या यांना खेळात सातत्य दाखवण्याची गरज आहे.

मयंक यादवच्या पुनरागमनाच्या आशा

लखनौच्या संघाला यंदाच्या मोसमात मयंक यादवच्या रूपात युवा वेगवान गोलंदाज लाभला. त्याने तीन सामन्यांमधून सहा फलंदाज बाद करीत आपली चुणूक दाखवली. त्याच्या गोलंदाजीतील वेगाचे कौतुक चोहोबाजूंनी होऊ लागले, पण दुखापतीमुळे तो मागील काही सामन्यांत खेळू शकला नाही. आता उद्या त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लखनौसाठी ही दिलासा देणारी बाब ठरणार आहे. यश ठाकूर, मोहसिन खान, मॅट हेन्‍री व रवी बिश्‍नोई या गोलंदाजांना राजस्थानच्या फॉर्ममध्ये असलेल्या फलंदाजांना बांधून ठेवावे लागणार आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply