Loksabha Election 2024 : 'बसपा'कडून 16 उमेदवारांची घोषणा; यादीमध्ये 7 मुस्लिम नावांचा समावेश

Loksabha Election 2024 : येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीने रविवारी १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बसपाचे राष्ट्रीय महासचिव मेवालाल गौतम यांनी ही यादी घोषित केली आहे. पक्षाने सहारनपूर येथून माजिद अली यांना तिकीट दिलं आहे. तर अमरोहा जागेसाठी मुजाहिद हुसैन यांना पक्षाने संधी दिली आहे.

बहुजन समाज पार्टीने तब्बल सात मुस्लिम उमेदवारांना मैदानामध्ये उतरवलं आहे. या नावांमध्ये मुरादाबादहून इरफान सैफी, रामपूरहून जीशान खान, संभलहून शौलत अली, आंवला मतदालसंघातून आबिद अली, पीलीभीतच्या जागेवरुन अनील अमहद खान उर्फ फूलबाबू यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Arvind Kejriwal Arrest : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ विरोधक एकवटले, ३१ मार्चला दिल्लीत मेगा रॅली

बसपाने रविवारी १६ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केराना येथून श्रीपाल सिंह, मुजफ्फरनगरहून दारा सिंह प्रजापती, बिजनौर मतदारसंघातून विजेंद्र सिंह, नगीना (एससी) मतदारसंघातून सुरेंद्र पाल सिंह, मुरादाबाद मतदारसंघातून मोहम्मद इरफान सैफी, रामपूर मतदारसंघातून जीशान खान, संभल मतदारंशातून शौलत अली.

तसेच मेरठमधून देववृत्त त्यागी, बागपत मतदारसंघातून प्रवीण बंसल, गौतमबुद्ध नगरमधून राजेंद्र सिंह सोळंकी, बुलंदशहर मतदारसंघातून गिरीश चंद्र जाटव, आंवलामधून आबिद अली, पीलीभीतमधून अनिस अमहद खान, शाहजहांपूरमधून डॉ. दोदराम वर्मा यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply