IPL 2022 | मुंबई-दिल्ली ब्रेबॉर्नवर आज आमनेसामने

मुंबई : सर्वाधिक पाच वेळा विजेता झालेला मुंबई इंडियन्सचा संघ उद्या मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सचा सामना करील. रोहित शर्माने कर्णधार म्हणून सर्वच स्तरांवर स्वत:ला सिद्ध केले आहे. रिषभ पंतकडे कर्णधारपदाचा मोठा अनुभव नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीतच नव्हे, तर संपूर्ण आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वाचा कस लागेल हे निश्‍चित आहे. या वेळी दोन्ही संघ विजयाने या स्पर्धेची सुरुवात करण्यासाठी आतुर झालेले असतील.

आयपीएलमध्ये यंदाच्या मोसमापासून १० संघांचा सहभाग असेल. त्याआधी मोठा लिलावही पार पडला आहे. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये बदल झालेला आहे. मुंबई इंडियन्सची मदार रोहितसह सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरॉन पोलार्ड व जसप्रीत बुमराह या खेळाडूंवर असणार आहे. दुखापतीमुळे सूर्यकुमार उद्याच्या लढतीत खेळू शकणार नाही, मुंबई इंडियन्सने यंदा दोन नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. सिंगापूरचा टीम डेव्हिड व दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेवीस ही त्यांची नावे. या दोघांकडूनही प्रचंड अपेक्षा आहेत. दोघांनीही आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केले आहे.

आयपीएलच्या आजच्या लढती

मुंबई इंडियन्स - दिल्ली कॅपिटल्स

ब्रेबॉर्न, दुपारी ३.३० वाजता

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर - पंजाब किंग्ज

डी. वाय. पाटील स्टेडियम, रात्री ७.३० वाजता



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply