International Airport : मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ सहा तास बंद; प्रवाशांची मोठी गैरसोय

मुंबई : देशातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्टींची मान्सूनपूर्व दुरुस्ती आणि देखभाल काल (मंगळवार) करण्यात आली. याकरिता विमानतळावरील सर्व वाहतूक सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत बंद ठेवण्यात आली होती, त्यामुळं प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून दिवसाला सुमारे 800 हून अधिक विमानांचे उड्डाण आणि आगमन होते. त्यामुळे धावपट्टीवर कमालीचा ताण असतो. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यापूर्वी धावपट्टीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मंगळवारी करण्यात आले. यासाठी सर्व विमान वाहतूक सहा तास बंद ठेवण्यात आली होती.

या वेळी धावपट्टी आणि टॅक्सी वेवरील जवळपास पाच हजार एरोनॉटिकल ग्राऊंड लाईट्स सर्व्हिस तपासण्यात आल्या. तसेच विमानांना दिशात्मक मार्गदर्शन करणाऱ्या १ हजार ३०० ग्राऊंड मार्किंग्ज नव्याने रंगवण्यात आल्या. शिवाय धावपट्टी परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या कमी करण्यासाठी दोन हजारहून अधिक नाले साफ करण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply