INS Vagir : "सायलेंट किलर" आयएनएस वागीर भारतीय नौदलाचे नवे अस्त्र

मुंबई : भारतीय नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे. कारण सोमवारी 23 जानेवारीला आयएनएस वागीर ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात तैनात करण्यात येणार आहे. आयएनएस वागीर ही पाचवी स्कॉर्पीन दर्जाची पाणबुडी भारतीय नौदलाचा "सायलेंट किलर" म्हणून आयएनएस वागिरला संबोधण्यात येत आहे .

डिझेल इलेक्ट्रिक या दोन्ही माध्यमातून कार्यान्वित असणार आहे. भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल आर हरी कुमार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. ही पाणबुडी माझगाव डॉक शिपबिल्डर लिमिटेड आणि फ्रान्सच्या नौदलाच्या संयुक्त कामगिरीने तयार करण्यात आली आहे.

पी 75 या कार्यक्रमातील ही पाचवी पाणबुडी असून या वर्षाच्या अखेरीस नौदलाला या कार्यक्रमातील सहावी आणि शेवटची पाणबुडी मिळणार आहे. फ्रान्सच्या स्कॉर्पिन तंत्रज्ञानाचा ही या पाणबुडीच्या विकासाकरिता वापर करण्यात आला आहे.

आयएनएस वागीर ही कलवरी श्रेणीतील सर्वात कमी कालावधीत तयार झालेली आणि चाचणी दरम्यान नौदलातील महिला अधिकाऱ्यांना घेऊन पाण्याखाली प्रवास केलेली एकमेव पाणबुडी आहे. वागीर या पाणबुडीचे जलावतरण 12 नोव्हेंबर 2020 रोजी झाले. या पाणबुडीच्या सागरी चाचण्या 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाल्या.

माझगाव गोदीने स्कॉर्पिन तंत्र वापरून तयार केलेल्या 4 पाणबुड्या जलावतरणापासून सरासरी अडीच वर्षांनंतर नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या. पण वागीर ही पाणबुडी दोन वर्षे दोन महिन्यांतच नौदलाच्या ताफ्यात दाखल होत आहे.

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply