INS Vagir : शत्रुची धडधड वाढली! 'INS वागीर' नौदलात दाखल; खास आहेत वैशिष्ट्ये

INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद आता आणखी वाढली आहे. मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांच्या उपस्थितीत आयएनएस वागीर नौदलात दाखल करण्यात आली.आयएनएस वागीरची निर्मिती फ्रेंच कंपनी नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने बांधले आहे.

आयएनएस वागीर ही कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. प्रोजेक्ट 75 अंतर्गत पहिली पाणबुडी INS कलवरी डिसेंबर 2017 मध्ये, दुसरी पाणबुडी INS खांदेरी सप्टेंबर 2019 मध्ये, तिसरी पाणबुडी INS करंज मार्च 2021 मध्ये आणि चौथी INS वेला नोव्हेंबर 2021 मध्ये भारतीय नौदलात सामील झाली होती. त्यानंतर आज INS वागीर नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.

INS वागीरची वैशिष्ट्ये

  • या पाणपुडीमुळे गुप्तचर माहिती गोळा करणे, समुद्रात भूसुरुंग टाकणे आणि टेहळणीच्या कामात याची महत्वपूर्ण मदत होणार आहे.

  • ही पाणबुडी किनारपट्टीवर आणि समुद्राच्या मध्यभागी दोन्ही ठिकाणी तैनात करता येऊ शकणार आहे.

  • INS वागीरचा समुद्रातील वेग ताशी 37 किलोमीटर इतका असून, ही पाणबुडी एकावेळी समुद्रात १२ हजार किमीचे अंतर पार करू शकते. त्याशिवाय ३५० मीटर खोलीपर्यंत जाऊ शकते.

  • ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यामुळे रडारदेखील याला सहजपणे पकडू शकत नाहीत.

  • या पाणबुडीमध्ये ५३३ मिमीचे ८ टॉर्पेडो ट्यूब आहेत, ज्यामध्ये क्षेपणास्त्रे लोड करता येतात.

  • हिंद महासागरात चीनच्या वाढत्या आव्हानाला तोंड देण्यासाठी ही पाणबुडी महत्त्वाची भूमिका निभाऊ शकते.

  • ही पाणबुडी 221 फूट लांब, 40 फूट उंच, 19 फूट खोल, 1565 टन वजनाची आहे.

  • वागीर पाणबुडी 45-50 दिवस पाण्यात राहू शकते. कोणत्याही हवामानात काम करण्यास सक्षम.

  • INS वागीरमध्ये 360 बॅटरी सेल असून, प्रत्येक बॅटरी सेलचे वजन सुमारे 750 किलो आहे.

  • या बॅटरीजच्या आधारे INS वगीर ६५०० नॉटिकल मैल म्हणजेच सुमारे १२००० किमी अंतर पार करू शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply