
हैदराबाद : हैदराबादमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी AIMIM पक्षाच्याआमदाराच्या मुलाची चौकशी करण्यात येत आहे. शिवाय या प्रकरणात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे.
सदर घटना हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात २८ मे रोजी घडली आहे. पीडितेच्या वडिलांनी या प्रकऱणी तक्रार दाखल केली असून तक्रारीनुसार, आमदाराचा मुलगा इतर काही जणांसह मुलीसोबत बाहेर गेला होता नंतर मुलीला कारमध्ये बसून संध्याकाळी ५.३० वाजता पबमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हंटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार जप्त केली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, मुलगी २८ मे रोजी ज्युबली हिल्स येथील अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पबमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी तीला काही लोकांनी लाल रंगाच्या आलिशान कारमध्ये लिफ्ट देण्याची ऑफर दिली. त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. यावेळी तिच्या मानेवर जखमा झाल्या असल्याचं तक्रारीत म्हंटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आमदाराच्या मुलाला अटक करण्यात यावी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतर ५ आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तेलंगणा भाजपचे (Telangana BJP) नेते के कृष्ण सागर राव यांनी केली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही पाच गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करत आहोत. हैदराबाद पोलिसांनी आरोपींची कार जप्त केली मग अरोपींना अटक का केली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
शिवाय मुख्यमंत्री केसीआर (CM KCR) किंवा AIMIM प्रमुख ओवेसी यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत का? एक गुंड एआयएमआयएमच्या आमदाराचा मुलगा आहे आणि दुसरा अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षाचा मुलगा आहे असंही के कृष्ण सागर राव म्हणाले आहेत.
तर सत्ताधारी लोक अशा घटनांमध्ये गुंततात हे जनतेचे दुर्दैव असून कधीतरी जुबली हिल्समध्येच सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मुलाने कोणाला तरी मारहाण केली आणि नंतर आमदार शांतपणे आरोपपत्रातून आपले नाव काढले होते आणि आता आमदाराच्या मुलाचा अशा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आपण पाहतो. सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांना पोलिसांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, मात्र या आरोपींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी तेलंगणा काँग्रेसचे प्रवक्ते प्रा दासोजू श्रावण यांनी केली आहे.
दरम्यान, सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अठरा वर्षीय आरोपी सादुद्दिन मलिक याला अटक केली असून आणखी २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी आणखी दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

