Pune : उड्डाणातील गोंधळामुळे आमदारांचा संताप; नागपूर अधिवेशनासाठी कारने निघण्याचा निर्णय

Pune : इंडिगो विमान कंपनीच्या अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने देशभरातील हजारो प्रवाशांची गैरसोय झाली आहेच. पण त्यात आता पश्चिम महाराष्ट्रातील आमदारही अडकले आहे. रविवारी (ता. ७) दुपारच्या विमानाचे तिकीट अनेकांनी काढले आहे. पण विमान रद्द होणार की वेळेवर उडणार यावरून गोंधळ निर्माण झाल्याने अनेक आमदारांनी स्वःच्या मोटारीने थेट नागपूर गाठण्याचा निर्णय घेतला आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (ता. ८) नागपूर येथे सुरु होते. त्यासाठी राज्याचे मंत्रिमंडळ रविवारी नागपूरमध्ये दाखल होत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना नागपूरला जाण्यासाठी लोहगाव विमानतळ हे सोईचे आहे.

यापूर्वीच्या सर्व अधिवेशनाला या पाच जिल्ह्यातील बहुतांश सर्वपक्षीय आमदार एकाच विमानाने प्रवास करून नागपूर गाठतात किंवा नागपूर वरून पुण्यात आलेले आहेत. यावेळी नागपूरचे अधिवेशन केवळ एका आठवड्यात उरकणार आहे. पण त्यासाठी पूर्णवेळ हजेरी लावणेही आवश्यक आहे. त्यामुळे या आमदारांनी रविवारी दुपारच्या विमानाचे तिकीट काढले होते. काही आमदारांना तिकीट काढण्यास उशीर झाल्याने सहा हजार रुपयांचे तिकीट हे १५-२० हजार रुपयांना काढावे लागले आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून देशात इंडिगो विमानाच्या सेवेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्याची विमान सेवा ठप्प झाल्याने शेकडो विमानाच्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. तर हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

Pune : विमान प्रवाशांना दिलासा; बंगळूर–दिल्लीसाठी विशेष गाड्यांची घोषणा गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न

हा प्रश्न अधिक चिघळल्याने रविवारचे नागपूरला जाणारे विमान हवेत झेपवणार की ऐनवेळी रद्द होणार? याची चिंता आमदारांना सतावत आहे. जर विमान ऐनवेळी रद्द झाले किंवा त्याला उशीर झाला तर आमदारांचे नागपूरचे वेळापत्रक कोलमडून जाणार आहे. त्यामुळे अनेकांनी रविवारचे विमान वेळेवर उडणार आहे का? ते रद्द होणार नाही ना याची चौकशी सुरु केली आहे. एकंदरीत स्थिती बघता अनेक आमदारांनी त्यांनी विमानाचे तिकीट रद्द करून स्वतःच्या गाडीने शनिवारी दुपारीच नागपूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. तर काही आमदार हे रविवारी सकाळी नागपूरला निघणार आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *