Indian Penal Code : देशात जुलैपासून 3 नवीन फौजदारी कायदे होणार लागू, ४२०, ३०२ रद्द; हे होणार मोठे बदल

Indian Penal Code : देशात लवकरच आयपीसीच्या जागी नवा फौजदारी कायदा लागू होणार आहे. भारत सरकारने त्याची औपचारिक घोषणाही केली आहे. ब्रिटीश काळापासून चालत आलेले जवळपास १५० वर्ष जुने भारतीय दंड संहिता कायदे अर्थात IPC, भारतीय पुरावा कायदा आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) या कायद्याच्या जागी १ जुलैपासून नवीन कायदे लागू होणार आहेत. हे तीन नवीन फौजदारी कायदे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायद्याच्या स्वरूपात असणार आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या १ जुलैपासून देशात हा कायदा लागू होणार आहे. याबाबत केंद्र सरकारने शनिवारी अधिसूचना जारी केली असून या तिन्ही कायद्यांना गेल्या वर्षी २१ डिसेंबर रोजी भारतीय संसदेची मंजूरी मिळाली आहे आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही २५ डिसेंबर रोजी याला संमती दिली.विशेष म्हणजे भारतीय न्याय (द्वितीय) संहिता, भारतीय नागरी संरक्षण (द्वितीय) संहिता, आणि भारतीय पुरावा (द्वितीय) विधेयक, १८६० चा भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) १९७३ आणि भारतीय पुरावा कायदा १८७२ कायदा (IEC) असे हे तीन नवीन कायदे यापूर्वीच संसदेत मंजूर झाले आहेत.

Ramdas Athawale : लोकसभेसाठी तिकीट नाही दिलं तर...; रामदास आठवलेंनी भूमिका केली स्पष्ट

भारतीय न्यायिक संहितेत २० नवीन कायदे जोडले गेले आहेत, तर आयपीसीमधील १९ कायदे वगळण्यात आले आहेत. याशिवाय 33 गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढवण्यात आली आहे. 83 तरतुदींमध्ये दंडाच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर 23 गुन्ह्यांमध्ये अनिवार्य किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली असून 6 गुन्ह्यांमध्ये सामुदायिक सेवा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply