Indian Independence Day : राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांना जाहीर

Fire Service Medal: राष्‍ट्रपती अग्निशमन सेवा पदकप्राप्‍त जवानांची यादी केंद्रीय गृह मंत्रालयाच्‍या अखत्‍यारीतील ‘अग्नि सेवा, नागरी सुरक्षा आणि गृहरक्षक महासंचालनालय’ यांच्याद्वारे स्‍वातंत्र्यदिनाच्‍या पूर्वसंध्‍येला (दिनांक १४ ऑगस्‍ट २०२३) जाहीर केली आहेत. त्‍यात मुंबई अग्निशमन दलातील प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र नारायणराव आंबुलगेकर, उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक कालीपद घोष, दुय्यम अधिकारी सुनील आनंदराव गायकवाड, प्रमुख अग्निशामक पराग शिवराम दळवी, अग्निशामक तातू पांडुरंग परब यांचा समावेश आहे.

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, सहआयुक्त (सुधार) रमेश पवार यांच्यासह विविध मान्यवरांनी राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक प्राप्‍त अग्निशमन अधिकारी व जवानांचे अभिनंदन करित त्‍यांच्‍या पुढील वाटचालीस शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. 

महाराष्‍ट्रातील आठ जवानांना राष्‍ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक जाहीर झाले आहे. यामध्ये "शौर्यम् आत्मसंयमनम् त्याग:" हे ब्रीदवाक्य असलेल्या मुंबई अग्निशमन दलातील ५ जवानांचा समावेश आहे. त्यांच्या बाबतचा संक्षिप्त तपशील पुढीलप्रमाणेः-

१) प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर हे ३० वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना यापूर्वी राष्‍ट्रपतींचे शौर्य पदक, आयुक्तांचे अतुलनीय शौर्य पदक आदी पुरस्काराने गौरविण्‍यात आले आहे.

२) उपप्रमुख अग्निशमन अधिकारी दीपक कालीपद घोष हे देखील गेली ३० वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना यापूर्वी राष्‍ट्रपतींचे शौर्य पदक, आयुक्तांचे अतुलनीय शौर्य पदकाने गौरविण्‍यात आले आहे. घोष यांनी ‘फायर इंजिनीअरींग’ या विषयात इंग्‍लंड येथील विदयापीठातून पी.एचडी पदवी प्राप्‍त केली आहे. ‘आयर्नमॅन’ किताब पटकाविणारे ते भारतीय अग्निशमन सेवेतील एकमेव अधिकारी आहेत. जागतिक अग्नि स्‍पर्धेत (वर्ल्‍ड फायर गेम) सहभागी होऊन त्‍यांनी भारतासाठी ७ पदके पटकाविण्‍याची कामगिरी देखील केली आहे.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे लोकसभेच्या सर्व ४८ जागांचा आढावा घेणार, उद्यापासून बैठकांचा धडाका

३) शहर भागातील मेमनवाडा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले दुय्यम अधिकारी (सब ऑफिसर) सुनील गायकवाड हे गेली ३२ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना उत्‍कृष्‍ट अग्निशामक पारितोषिकाने यापूर्वी दोनवेळा गौरविण्‍यात आले आहे.

४) भायखळा येथील अग्निशमन केंद्रात कार्यरत असलेले प्रमुख अग्निशामक (लिडिंग फायरमन) पराग शिवराम दळवी हे गेली ३१ वर्षे मुंबई अग्निशमन दलात कार्यरत असून त्‍यांना खात्‍याअंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.

५) अग्निशामक (फायरमन) तातू पांडुरंग परब हे सध्‍या विक्रेाळी अग्निश्‍मन केंद्रात कार्यरत असून त्‍यांनी मुंबई अग्निशमन दलात ३२ वर्षे सेवा बजाविली आहे. त्‍यांनादेखील खात्‍याअंतर्गत विविध पारितोषिकांनी गौरविण्‍यात आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply