Indian Army : लष्कराला मिळणार 'सुरक्षाकवच'; 62 हजार 500 बुलेटफ्रूफ जॅकेटसाठी निघालं तातडीचं टेंडर!

नवी दिल्लीः दहशतवाद्यांकडून स्टील कोअर बुलेट वापरण्यात येत आहेत. त्यामुळे आता अत्याधुनिक जॅकेटसाठी लष्कराने तातडीची निविदा काढली आहे.

'मेक इन इंडिया' अंतर्गत संरक्षण मंत्रालयाने जॅकेटसाठी दोन स्वतंत्र टेंडर काढले आहेत. यामध्ये ४७ हजार ६२७ जॅकेटसाठी जनरल निविदा तर १५ हजार जॅकेटसाठी आणीबाणीच्या खरेदी प्रक्रियेंतर्गत निविदा काढली आहे. याबाबची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी एएनआयला दिली.

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि भारतीय सुरक्षा दल यांच्या झालेल्या चकमकीमध्ये जॅकेट छेदणाऱ्या गोळ्यांचा वापर झाला आहे. त्यामुळे लष्कराने तातडीने स्टील कोअर बुलेटफ्रूफ जॅकेटसाठी टेंडर काढलं आहे.

यामध्ये बीपीजी ७.६२ मिमी आर्मर पीअरिंग रायफल आणि १० मीटर अंतरावरुन गोळीबार केल्यास स्टील कोअर बुलेटपासून सैनिकांचं रक्षण होणार आहे. केवळ भारतात बनवल्या जाणाऱ्या जॅकेटचीच लष्कर खरेदी करणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply