IND vs NZ : भारत विरूद्ध न्युझीलंड सामन्यावेळी घातपात करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका संशयिताला घेतलं ताब्यात

IND vs NZ : भारत विरूद्ध न्युझीलंड सामन्यावेळी घातपात करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने लातूर जिल्ह्यातील १७ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

धमकी देणारा तरुण विराट कोहलीचा मोठा चाहता आहे. याने धमकी का दिली याचा तपास पोलिस करत आहेत. ट्विटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग करण्यात आला होता. सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा संदेश देणारा फोटोही पोस्ट करण्यात आला होता.

IND Vs NZ : 'आग लगा देंगे' भारत-न्यूझीलंड सेमीफायनलदरम्यान वानखेडेवर घातपात? मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर धमकी

धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या ट्विटरला टॅग करत, एका फोटोत गन, हॅड ग्रेनेड आणि काडतुस असलेले चित्र पोस्ट केले आहे. त्याचबरोबर भारत न्यूझीलंड सामन्या दरम्यान आग लगा देंगे अशा आशयाचे चित्र पोस्ट केले होते. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

मुंबईत होणाऱ्या या सामन्यासाठीपोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने या सामन्याला मोठी गर्दी होणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांसह मुंबई पोलिस देखील सज्ज झाले आहेत. दरम्यान मुंबई पोलिसांनी प्रेक्षकांनी आवश्क ती काळजी घ्यावी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा असं आवाहन केलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *