T20 World Cup 2024 : ICCची मोठी घोषणा! टीम इंडिया 'या' नव्या मैदानावर खेळणार सराव सामना

India vs Bangladesh T20 World Cup 2024 Warm-Up Match : आसीसीने नुकतेच टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. 27 मे ते 1 जून या कालावधीत अमेरिका, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे वर्ल्ड कपचे सराव सामने खेळवले जाणार आहेत.

वर्ल्ड कपपूर्वी एकूण 16 सराव सामने होणार आहेत. ज्यामध्ये टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात शेवटचा सराव सामना होणार आहे. हा सामना १ जून रोजी होणार आहे. मात्र या सामन्याचे ठिकाण यापूर्वी जाहीर करण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत आता हा सामना कुठे खेळवला जाईल हे आसीसीने सांगितले आहे.

टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या मुख्य स्पर्धेपूर्वी फक्त एक सराव सामना खेळणार आहे. हा सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मैदानाचा हा पहिलाच सामना असेल. नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम स्पर्धेसाठी सज्ज आहे.

IPL 2024 Rahul Tripathi : डोळ्यात पाणी; 'हा...ना...'च्या गोंधळात राहुल त्रिपाठी झाला रन आऊट, काव्या मारन पण झाली हैराण

या स्टेडियमचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. आता हे स्टेडियम पहिला सामना आयोजित करण्यासाठी सज्ज आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 पासून खेळवला जाईल. या मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना रंगणार आहे. या स्टेडियमची क्षमता 34,000 प्रेक्षकांची आहे.

16 सराव सामन्यांदरम्यान चाहत्यांना फक्त 2 सामन्यांमध्ये प्रवेश मिळेल. चांगली गोष्ट म्हणजे नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणारा भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना चाहत्यांसाठी खुला असेल.

त्याचवेळी वेस्ट इंडिजमधील एक सामना चाहत्यांसाठी खुला असेल. याशिवाय चाहते सर्व सराव सामन्यांना उपस्थित राहू शकणार नाहीत. 23 मे पासून चाहत्यांना भारत-बांगलादेश सामन्याची तिकिटे खरेदी करता येणार आहेत.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply