India Alliance : अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांची तात्काळ सुटका करा; इंडिया आघाडीच्या या आहेत 5 मोठ्या मागण्या

India Alliance : दिल्लीत महारॅलीला संबोधित करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी इंडिया आघाडीच्या पाच मागण्या मांडल्या आहेत. त्या म्हणाल्या आहेत की, इंडिया आघाडीची पहिली मागणी आहे की, लोकसभा निवडणुकीत भारतीय निवडणूक आयोगाने सगळ्यांना सामान संधी आणि वातावरण मिळेल हे सुनिश्चित करावं. दुसरी मागणी म्हणजे निवडणूक आयोगाने आयटी, ईडी आणि सीबीआयची जबरदस्तीने होत असलेली कारवाई थांबवावी.

इंडिया आघाडीची तिसरी मागणी आहे की, हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांची तात्काळ सुटका करावी. चौथी मागणी आहे की, निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांची आर्थिक गळचेपी करणारी कारवाई तात्काळ थांबवावी.

Wardha News : वर्धा मतदारसंघात मविआचे जोरदार शक्तिप्रदर्शन; शरद पवारांच्या उपस्थितीत अमर काळे दाखल करणार उमेदवारी अर्ज

तसेच पाचवी मागणी आहे की, निवडणूक रोख्यांचा वापर करून भाजपने केलेल्या सूडबुद्धी, खंडणी आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि यासाठी एसआयटी स्थापन करावी. 

याआधी सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी लोकसभा  निवडणुकीत भाजपवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला. राहुल गांधी म्हणाले, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत. मॅच फिक्सिंग ऐकू येते. यामध्ये अनावश्यक खेळाडू विकत घेऊन दबाव निर्माण करून जिंकणे, यालाच मॅच फिक्सिंग म्हणतात. आजच्या निवडणुकीतही तेच होत आहे. सत्ता त्यांची आहे आणि त्यांनी आमच्या दोन खेळाडूंना तुरुंगात टाकले.

राहुल पुढे म्हणाले की, ते 400 पारबद्दल बोलतात पण ते 180 च्या वर जाणार नाहीत. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील सर्वात मोठ्या पक्षाची बँक खाती बंद करण्यात आली आहेत. पोस्टर लावायचे आहेत पण पैसे नाहीत. नेत्यांना तुरुंगात टाकले आहे. ते मॅच फिक्स करत आहेत. हे काम नरेंद्र मोदी आणि देशातील काही उद्योगपती करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply