Independence Day : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांची होणार कारागृहातून सुटका, केंद्रीय गृह सचिवालयाचे निर्देश

Independence Day 2023: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्यातील १८६ कैद्यांना स्वातंत्र्यदिनी मंगळवारी (ता. १५) कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने कारागृहात चांगली वर्तणूक आणि निकषानुसार पात्र असलेल्या कैद्यांना विशेष माफी देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील १८६ कैद्यांना उद्या कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

या कैद्यांची पात्रता तपासण्यासाठी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने एकूण तीन टप्प्यांत ५८१ कैद्यांच्या सुटकेसाठी दिलेल्या प्रस्तावास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.

Dhule Tiranga Rally : 76वा स्वातंत्र्यदिन : तब्बल 1111 मीटर लांब तिरंगा ध्वज; धुळ्यात निघाली महाकाय तिरंगा रॅली

त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२ रोजी २०६ कैदी, दुसऱ्या टप्प्यात २६ जानेवारी २०२३ रोजी १८९ कैदी कारागृहातून मुक्त करण्यात आले आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात येत्या १५ ऑगस्ट रोजी १८६ कैद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.

‘कैद्यांमध्ये शिस्त आणि त्यांच्या आचरणात सधारणा व्हावी, हा माफी योजनेचा उद्देश आहे. कारागृहातून सुटका होणाऱ्या कैद्यांनी गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक व्हावे,’’ असे आवाहन राज्य कारागृह विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply